गडचांदूरात राजकीय वाद पेटला, भाजप उमेदवार सुरज पांडेची रा. कॉ. शरड पवार गटाच्या प्रकाश निमजे यांना बेदम मारहाण

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अरुण निमजे यांचे भाऊ आहेत प्रकाश, गंभीर दुखापती नंतर रुग्णालयात दाखल, शहरातून निघाला भाजप विरोधात सर्वपक्षीय मोर्चा, शहर बंदचे आवाहन

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात नगरपरिषद निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर राजकीय हिंसा बघायला मिळत आहे. भाजपचे प्रभाग 10 चे उमेदवार सुरज पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण निमजे यांचे भाऊ प्रकाश निमजे यांच्यावर वीट मारत हल्ला केला त्यात प्रकाश यांना गंभीर दुखापत झाली असून कान व डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पांडेच्या उमेदवारीविरोधात नागरिक संतप्त असून पोलिस ठाण्यात मोठी गर्दी करत निषेध व्यक्त करण्यात आला. तडीपारीची मागणी जोर धरत असून निषेधार्थ शहर बंदचे आवाहन करत सर्वपक्षीय रॅली काढण्यात आली. पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी गडचांदूर येथे दाखल झाले असून तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेसंदर्भात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *