चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात लाखोंचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, गोडाउनमध्ये ठेवून वाहनातून होत होती तस्करी, वरोरा पोलिसांची कारवाई

राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू वरोरा येथील एका गोडाउनमध्ये ठेवल्याची तसेच वाहनातून त्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. शिवसेनेचे नेते मुकेश जीवतोडे आणि चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी पुढाकार घेऊन सुगंधित तंबाखू पोलिसांना पकडून दिला.

वरोरा तालुका व शहर परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती जीवतोडे आणि मत्ते यांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी गोडाउनवर धाड घालून सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. यात २० ते २५ लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.

एका तंबाखूविक्रेत्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू पोलिसांनी हस्तगत केला. पोलिसांनी साठा जप्त करून अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पाचारण केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *