शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांना 24 तासाची बंदी तर दुसरे शेतकरी नेते किशोर डुकरे यांना 5 दिवस केली बंदी
चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या 2 नेत्यांना चक्क शहरबंदी करण्यात आली आहे. यातील एक नाव सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांचे असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मत्ते यांना 24 तासाची वरोरा शहर बंदी तर दुसरे शेतकरी नेते किशोर डुकरे यांना 5 दिवस बंदीचा आदेश बजावण्यात आला आहे.
23 सप्टेंबर रोजी याच तालुक्यातील खांबाडा येथे बच्चू कडू यांच्यासोबत रस्ता रोको केल्याने शेकडो शेतकऱ्यांसह या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज वरोरा शहरातील गांधी चौकात गुन्हे दाखल झाल्याच्या विरोधात जेलभरो आंदोलन जाहीर करण्यात आले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वरोरा उपविभागीय अधिका-यांनी ही शहरबंदीची धक्कादायक कारवाई केली आहे.
