18 राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गात असलेल्या परीट-धोबी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाज आक्रमक झाला आहे. राज्यातही परीट-धोबी समाजाची अनुसूचित जाती प्रवर्गात समावेशाची मागणी पुढे रेटण्यात येत आहे. मागील अधिवेशनात जाहीर करण्यात आलेली परीट धोबी समाजासाठी महामंडळ स्थापनेची मागणी रखडली आहे.
हा समाज ओबीसी प्रवर्गात सध्या समाविष्ट असला तरी प्रस्थापित दिग्गज जातींमुळे परीट-धोबी समाज आरक्षण लाभापासून वंचित आहे. 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळ अधिवेशनात समाज बांधव विशेष मागास प्रवर्गात समावेशासाठी आंदोलन करणार असून चंद्रपुरात समाज संघटनेने बैठक आयोजित करून आंदोलनाला बळ दिले.
