राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

राज्यातील दिग्गज काँग्रेसने ते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदार संघातील मोठी घडामोड, सामाजिक क्षेत्रात कार्यरत रोहित बोम्मावार आणि दिवाकर निकुरे भाजपच्या तंबूत , काँग्रेस पथनाच्या दिशेने बावनकुळे यांचा टोला

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्त्यांचा आज चंद्रपूर जिल्ह्यात भाजपात प्रवेश सोहळा पार पडला. राज्यातील दिग्गज काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदार संघात ही मोठी घडामोड पुढे आली. सामाजिक क्षेत्रात कार्यरत रोहित बोम्मावार आणि दिवाकर निकुरे भाजपच्या तंबूत दाखल झाले. या पुढच्या काळात जिल्हा परिषद निवडणुका होऊ घातल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर सुमारे हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये घेतलेला प्रवेश काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा ठरला. याप्रसंगी बोलताना काँग्रेस पतनाच्या दिशेने जात आसल्याचो टीका बावनकुळे यांनी केली. केंद्रातील काँग्रेस नेते आणि राज्यातील पदाधिकारी यांच्यात समन्वय उरला नसून जनतेने काँग्रेसला सोडल्यामुळे आता नेते -कार्यकर्ते जनहिताची कामे करणाऱ्या भाजपकडे आकर्षित होत आहेत असेही बावनकुळे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *