चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नवेगाव जंगलातील चंदा आणि चांदणी या दोन वाघिणींना राज्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थानिकांचा विरोध

प्रजनन काळ असलेल्या 2 वाघिणीपेक्षा हल्लेखोर आणि समस्याग्रस्त वाघांना इतरत्र हलवण्याचा आग्रह

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नवेगाव जंगलातील चंदा आणि चांदणी या दोन वाघिणींना राज्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला आहे. प्रजनन काळ असलेल्या या 2 वाघिणीपेक्षा हल्लेखोर आणि समस्याग्रस्त वाघांना इतरत्र हलवण्याचा वन्यजीवप्रेमींचा आग्रह आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात शंभरहून अधिक वाघ आहेत. याशिवाय जिल्ह्यातील प्रादेशिक व राखीव जंगलांमध्ये वाघांची संख्या 100 व त्याहून अधिक आहे. उत्तम वनव्यवस्थापन आणि अधिवासासाठी लागणारी अनुकूल वातावरण निर्मिती वाघ संख्येच्या वृद्धीचे मुख्य कारण आहे. मात्र वाढते वाघ प्रादेशिक व राखीव जंगलांच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये शिरकाव करत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्षाने परिसिमा गाठली आहे.

पीक पेरणी व कापणीच्या काळात मोठ्या संख्येत वाघांच्या हल्ल्यात ग्रामस्थांचे मृत्यू होत आहेत. हे टाळण्यासाठी वनविभागाने सातत्याने हल्लेखोर व समस्याग्रस्त वाघांना जेरबंद करण्याची मोहीम चालविली आहे. याचाच दुसरा उपाय म्हणजे काही वाघांना राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित केले जात आहे. मात्र हल्लेखोर व समस्याग्रस्त वाघांना इतरत्र हलवण्यापेक्षा ज्या वाघिणींनी कुठलेही हल्ले केले नाहीत व समस्याग्रस्त नाहीत अशा वाघिणींना हलवले जात आहे त्यामुळेच हा विरोध केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *