T.D.U.C. Photographer Association, Chandrapur आणि Cavok Service, Pune यांच्या संयुक्त विद्यमाने “भव्य “फोटो-व्हिडिओ एक्स्पो 2025” दि. 18 डिसेंबर 2025 रोजी चंद्रपूर शहरातील तुकूम येथील पोलीस कल्याण सभागृहात होत आहे.
मुंबई, दिल्ली आणि पुणे यांसारख्या महानगरांतील भव्य एक्स्पोचा अनुभव चंद्रपूरकरांना मिळणार आहे. हा कार्यक्रम केवळ प्रदर्शन नाही, तर फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि फिल्म क्षेत्रातील एका नव्या क्रांतीचा प्रारंभ आहे. तंत्रज्ञान, कला आणि सिनेमॅटिकतेचा संगम या भव्य एक्स्पोमध्ये होणार असून नव्या तंत्रज्ञानाच्या जगाचे दस्वाजे उघडले जाणार आहेत.
# अत्याधुनिक कॅमेरे, लेन्सेस, ड्रोन आणि गॅझेट्सचे थेट प्रात्यक्षिके
# लाईटिंग इक्विपमेंट्स, स्टुडिओ सेटअप आणि एडिटिंग सॉफ्टवेअर्सवरील वर्कशॉप्स
# राष्ट्रीय आणि सिने-इंडस्ट्रीतील तज्ञांकडून मार्गदर्शन
# फिल्म, ड्रामा आणि डिजिटल कंटेंटवरील चर्चासत्रे
# नेटवर्किंग आणि अनुभव शेअरिमची सुवर्णसंधी
# क्रिएटिव्ह आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे व्यासपीठ
# फिल्म आणि सिने इंडस्ट्रीसाठी सुवर्णसंधी,
फिल्ममेकर, शॉर्ट फिल्म डायरेक्टर, थिएटर आर्टिस्ट, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि ड्रामा क्षेत्रातील नवोदित कलाकारांसाठी हा एक्स्पो ठरणार आहे प्रेरणादायी मंच
# सिनेमॅटिक शूटिंग तंत्रांचे मार्गदर्शन
# फिल्म एडिटिंग व साउंड डिझाईनवरील वर्कशॉप्स
# प्रॉडक्शन हाउसेस व कॅमेरा बँड्सशी थेट संवाद
# OTT व डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट क्रिएशनच्या नव्या दिशा
अशी या एक्स्पोची ठळक वैशिष्ट्ये राहणार आहेत.
फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, पत्रकार, पोर्टल न्यूज प्रतिनिधी, कलाकार आणि फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेल्या प्रत्येक व्यावसायिकाला ज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचा एकत्र संगम उपलब्ध करून देणे आहे. हाच या एक्स्पोचा खरा हेतू आहे. आज फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी हे फक्त छंद नाहीत, तर त्या प्रोफेशनल आणि सिनेमॅटिक इंडस्ट्रीज बनल्या आहेत. या एक्स्पोमधून आधुनिक उपकरणांचा अनुभव, तज्ञांचे व्यावसायिक मार्गदर्शन, उद्योगातील नव्या संपर्काची संधी, नवीन पिढीच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्थान निर्माण करण्याची प्रेरणाही मिळणार आहे.
TDUC Photographer Association, Chandrapur यांच्या वतीने प्रीतम खोब्रागडे, विनोद झोडे, गणेश साळवे, राकेश मस्के, रमेश तांडी, राजेश नाकाडे, देवा बुरडकर, आकाश सिंग, अमूल कोत्रिवार, सूर्यकांत मोरे, नितेश दुमणे आदींनी संपूर्ण विदर्भातील फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, पत्रकार, पोर्टल न्यूज प्रतिनिधी, फिल्ममेकर, थिएटर आर्टिस्ट आणि नवोदित कलाकारांना चंद्रपूर फोटो व्हिडिओ एक्स्पो 2025 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
