चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर “मामा मेल” वाघाच्या शिकारीचा थरार बघायला मिळालाय. त्याने भर दिवसा महामार्गावरून गायीची शिकार ओढत नेली. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी हे दृश्य मोबाईल कॅमेरात कैद केले.
मामा मेल या अतिशय प्रसिद्ध वाघाचा अधिवास मुल- चंद्रपूर महामार्गावरील मामला परिसरात आहे. आगडी भागात काल महामार्गाच्या बाजूला त्याने गाईची शिकार केली आणि शिकारीवर ताव मारला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली. त्यामुळे मामा मेलने आपली शिकार महामार्ग ओलांडून जंगलाच्या आत नेली. मामा मेल च्या या थरारक शिकारीचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.
