ताडोबाच्या पक्षी वैभवात नवी भर, वन्यजीव अभ्यासक आणि वनाधिकारी रुंदन कातकर यांनी शोधला युरोपियन नीलपंख पक्षी

कोळसा कुरण क्षेत्रात पहिल्यांदाच आढळला हा पक्षी, युरोपियन रोलर या नावानेही ओळखल्या जाणा-या पक्षाचा शीतकाळात असतो प्रवास, मात्र हा दुर्लभ सुंदर पक्षी ताडोबात प्रथमच आढळल्याने वन्यजीव वैविध्यतेत भर

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पक्षी वैभवात नवी भर पडली आहे. वन्यजीव अभ्यासक आणि ताडोबातील कोळसा क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन कातकर यांनी युरोपियन नीलपंख पक्षी शोधून काढला आहे.

कोळसा कुरण क्षेत्रात हा पक्षी पहिल्यांदाच आढळला असून युरोपियन रोलर या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या पक्षाचा शीतकाळात प्रवास असतो. हा दुर्लभ- सुंदर पक्षी ताडोबात प्रथमच आढळल्याने वन्यजीव वैविध्यतेत भर पडली आहे.

युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत आढळणारा हा पक्षी भारतात येत नाही. म्हणूनच ही घटना उत्साहवर्धक ठरली आहे. सुमारे 29 ते 32 cm लांब असलेला हा पक्षी निलवर्णी आभा लेवून असतो. त्याचे भक्ष्य, छोटे- मोठे कीटक ,पाली असून युरोपियन रोलरच्या शोधाने ताडोबातील समृद्ध वने, वन्यजीव वैविध्य व नैसर्गिक अधिवास महत्व देखील प्रामुख्याने पुढे आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *