चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या आयुध निर्माणी परिसरात वाघ व बिबट्याचा नेहमीच वावर दिसून येतो. ताजा व्हिडिओ एक बिबट रस्त्याच्या कडेला गाईवर हल्ला करून ताव मारतानाचा आहे..जो वायरल झालाय.
आयुध निर्माणीच्या मागचा परिसर ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाची बाह्य सीमा आहे. यामुळेच या भागात वाघ, बिबटे ,अस्वल याचा नेहमीच संचार दिसून येतो. अनेकदा वनविभागाने या भागातून वाघ- बिबटे- अस्वल यांना जेरबंद करून अन्यत्र पाठवणी केली आहे. ताज्या व्हिडिओत पूर्ण वाढीचा बिबट एका गाईवर हल्ला करून तिला संपवताना दिसून येत आहे. रस्त्यावर अशा पद्धतीने गाईवर केलेला हल्ला परिसरात दहशत निर्माण करून गेला आहे.
