चंद्रपूर : महेंद्र भडके असं 32 वर्षीय मृतक सर्पमित्राचं नाव, बल्लारपूर शहरातील विद्यानगर भागात राहतात महेंद्र भडके, आज सकाळी बल्लारपूर शहरातील बी टी टी एल नर्सरी परिसरात आढळला नाग, स्थानिकांनी याची माहिती भडके यांना देताच ते घटनास्थळी झाले दाखल, मात्र नाग पकडण्याचा प्रयत्नात त्यांना 2 वेळा झाला सर्पदंश, बल्लारपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आले पाठवण्यात, मात्र उपचारादरम्यान झाला त्यांचा मृत्यू, भडके यांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील सर्पमित्र आणि वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ
चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमींसाठी धक्कादायक बातमी…
साप पकडताना झालेल्या सर्पदंशामुळे बल्लारपूर शहरातील सर्पमित्राचा मृत्यू झाला आहे. बल्लारपूर शहरातील विद्यानगर भागात राहणारे महेंद्र भडके, वय 32 वर्ष, हे स्थानिक स्तरावर प्रसिद्ध सर्पमित्र म्हणून ओळखले जात होते. आज सकाळी बल्लारपूर येथील बी टी टी एल नर्सरी परिसरात नाग आढळल्याची माहिती स्थानिकांनी भडके यांना दिली. सर्प पकडण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले मात्र, नाग पकडण्याच्या प्रयत्नात त्यांना दोन वेळा सर्पदंश झाला.
तत्काळ त्यांना बल्लारपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर झाल्याने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.
तेथे उपचारादरम्यान महेंद्र भडके यांचा मृत्यू झाला. सर्प आणि वन्यजीवांचे रक्षण करत असताना स्वतःचा जीव गमावलेल्या या सर्पमित्राच्या निधनाने बल्लारपूर आणि संपूर्ण जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
