सध्या सप्टेंबर महिन्यातील 55 हजार 741 हेक्टर वरील शेत पिकांच्या नुकसानीचे केले जात आहेत प्रत्यक्ष पंचनामे
चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 120% एवढा पाऊस पडून गेलाय. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात विविध महसूल मंडळात 65 वेळा अतिवृष्टी झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कापूस -धान- सोयाबीन -तूर ही प्रमुख पिके आहेत. याशिवाय भाजीपाला पिकांची संख्याही मोठी आहे.
जिल्ह्यात मॉन्सूनच्या सुरुवातीला जून आणि जुलै या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 7 कोटी 33 लाख रुपये भरपाई वितरणाचे काम सध्या सुरू आहे.
याशिवाय ऑगस्ट या एकाच महिन्यात जिल्ह्यात 14 हजार 600 हेक्टर वर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र सर्वाधिक नुकसान सप्टेंबर महिन्यात झाले असून या महिन्यात सातत्याने पाऊस पडत आहे. परिणामी 55 हजार 741 हेक्टरवर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पंचनामांची प्रक्रिया सुरू असून यानंतरच अंतिम आकडा जाहीर होणार आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे यंदा शेत पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्याची कंबरडे मोडणारी ठरली आहे
