एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याची 31 डिसेंबर 2025 आहे अंतिम तिथी, चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप सव्वादोन लाख वाहनधारकांना लावायची आहे ही नंबर प्लेट

आतापर्यंत केवळ 39 टक्के वाहनधारकांनी लावली आहे नवीन नंबर प्लेट, 31 डिसेंबर नंतर 1000 रुपये एवढा बसणार दंड

राज्यात एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याची 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तिथि आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप सव्वादोन लाख वाहनधारकांनी ही नंबर प्लेट लावलेली नाही. आतापर्यंत केवळ 39 टक्के वाहनधारकांनी ही नवीन नंबर प्लेट लावली आहे.

एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य सरकारने आतापर्यंत या अंतिम तिथीला पाच वेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र तरीही वाहनधारकांनी याबाबत कुठलेही गांभीर्य दाखवलेले नसल्याचे उघड झाले आहे. आता 31 डिसेंबर नंतर वाहनांना 1000 रुपये एवढा दंड ठोठावला जाणार आहे. परिवहन विभागाच्या वतीने नवी उच्च सुरक्षा मानके असलेली नंबर प्लेट लावून घेण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *