गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ऑक्टोंबर 2025 या संपूर्ण महिन्यात करण्यात येणार विविध सायबर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन करण्यात आले. दिवसेंदिवस सायबर अपराधांचे तसेच इंटरनेट व समाज माध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. यावर आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) यांच्या मार्गदर्शनाखाली, ऑक्टोबर 2025 हा महिना ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून संपूर्ण देशभरातील सर्व जिल्ह्रामध्ये साजरा करण्यात येत आहे.
याच उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले. सायकल रॅलीचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा, सायबर फसवणूक प्रतिबंध आणि डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे सायबर गुन्ह्रांचे प्रमाण देखील वाढत असून, प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या महिन्यात विविध जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, शाळा-महाविद्यालयांमधील जनजागृती मोहिम, ऑनलाईन वेबिनार्स तसेच सोशल मिडियावरील प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे.

