मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर पालकमंत्री पहिल्यांदाच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता शेतकऱ्यांच्या बांधावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके आज पहिल्यांदाच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. उईके यांनी चिमूर आणि वरोरा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन खराब झालेल्या शेतांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. चिमूर तालुक्यातील जवळपास 80 टक्के सोयाबीनचे पीक हे अतिवृष्टीमुळे खराब झालं असून जिल्ह्यातील अधिकांश सोयाबीन खराब झाल्याचा प्राथमिक अंदाज पालकमंत्र्यांनी वर्तविला आहे. मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं म्हणत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *