चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील धाबा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

पाच दिवसांत २३ लाखांच्या उच्चदाब वीज केबल चोरीचा उलगडा, ८८ लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त , ५ आरोपी अटकेत

चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली परिसरातून चोरीस गेलेल्या तब्बल २३ लाख ८८ हजार रुपयांच्या उच्च दाब वीज केबल चोरी प्रकरणाचा अवघ्या पाच दिवसांत छडा लावत धाबा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीचा मुद्देमाल, वाहने व मोबाईलसह एकूण ८८ लाख ३४ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राकेश जागेश्वर भोयर (३४) रा. खरबी नागपूर, ज्योतीष प्रभू प्रसाद (३९) रा. पारडी नागपूर, अभिनयकुमार रामलक्षण प्रसाद (२९) रा. परसोडी नागपूर, हरिप्रसाद श्यामजी उईके (३४) रा. परसोडी नागपूर, दिपक चेकर उईके (२७) रा. इंदिरा नगर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.

एक खाजगी कंपनी महावितरणच्या नव्या विद्युत लाईन प्रकल्पाचे काम करीत असून गोजोली-सुकवासी फाटा जंगल परिसरात Power Cable चे दोन ड्रम ठेवण्यात आले होते. अज्ञात चोरट्यांनी हे केबल ड्रम चोरी करून नेले होते. याप्रकरणी धाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींकडून चोरीस गेलेले १९/३३ KV HT Power Cable चे दोन ड्रम, एक हायड्रा क्रेन, दोन आयशर वाहने, एक होंडा सिटी कार तसेच विविध मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ८८ लाख ३४ हजार ३०५ रुपये आहे.
आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास धाबा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *