आज रेल्वे स्टेशनवर उतरले ४३३० मेट्रिक टन युरिया खत, खत पुरवठ्यात कुठलाही विलंब सहन केला जाणार नाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे ठाम निर्देश
चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या युरिया खताच्या टंचाईवर अखेर उपाययोजना करण्यात आली आहे. आज चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर आलेल्या युरिया खताच्या आगमनावेळी पाहणी करण्यात आली. जिल्ह्यासाठी तब्बल ७००० मेट्रिक टन खताचे आवंटन निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी ४३३० मेट्रिक टन युरिया खत आजपर्यंत उतरले आहे.
महाराष्ट्राच्या जीएसडीपीमध्ये चंद्रपूरचे योगदान महत्त्वाचे असल्याने, खत पुरवठा हा शेतकऱ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, यात कुठलाही विलंब किंवा सबब चालणार नाही असे स्पष्ट निर्देश कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी मी ठामपणे उभा आहे, असा विश्वासही यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
