मुंबई : जगाच्या पाठीवर अनेक कलाकार येतात आणि जातात, पण काही कलाकार असे असतात, जे फक्त त्यांच्या कलेनेच नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वानेही अजरामर होतात. असाच एक जागतिक आयकॉन म्हणजे ‘पॉपचा बादशाह’ मायकल जॅक्सन. १९९६ मध्ये मायकल जॅक्सनने भारताला भेट दिली होती आणि तो दिवस आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मुंबईत त्याच्या ‘HIStory World Tour’ चा भाग म्हणून एक भव्य कॉन्सर्ट झाला होता, ज्याला तब्बल ३५,००० फॅन्सनी हजेरी लावली होती. पण या ऐतिहासिक भेटीबद्दल अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नुकताच एक असा खुलासा केला आहे, जो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!
