गडचिरोली जिल्ह्यातील 12 जुलैच्या घटनेतील आरोपी अटकेत, नक्षल उपस्थिती असल्याचे भासवून लावले होते बॅनर

पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि खबरी जाळे वापरून हुडकून काढले आरोपी

गडचिरोली जिल्ह्रातील नक्षल चळवळ संपुष्टात आली असून गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही नक्षली शिल्लक नाही. गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सातत्याने अभियान राबविण्यात येऊन “ऑपरेशन अंतिम प्रहार” च्या माध्यमातून विशेष शोध मोहीम राबवून गडचिरोली जिल्ह्रातील नक्षल्यांची दहशत संपुष्टात आणली आहे.

मात्र 12 जुलै रोजी काही अज्ञात व्यक्तींकडून नक्षली असल्याचे भासवून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने एटापल्ली परिसरातल्या पिपली- बुर्गी पोलीस ठाणे हद्दीत पत्रके व बॅनर लावण्यात आले होते. गडचिरोली पोलीस दलाने बारकाईने तपास करत दहशत निर्माण करणा­या दोन व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. पोस्टे पिपली बुर्गी पासून साधारण 5 किमी अंतरावर जिजावंडी टोलाकडे जाणा-­या रस्त्याच्या फाट्यापुर्वी डाव्या बाजुस असलेल्या गावाच्या दिशादर्शक फलकाला एक लाल रंगाचे कापडी बॅनर आणि कागदी पोस्टर आढळून आले होते. पोस्टर – बॅनरवर नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने मजकुर लिहण्यात आला होता.
पोलिसांनी 1) शिवा अनिल मिस्त्री वय 48 वर्ष, रा. तरुणनगर ता. पाखांजुर जि. कांकेर (छ.ग.) आणि 2) रोहीत रंज्जीत मल्लीक वय 25 वर्ष, रा. वटेली ता. एटापल्ली जि. गडचिरोली या दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *