नक्षल पॉलीट ब्युरो सदस्य आणि केंद्रीय समिती सदस्य भुपती ऊर्फ सोनु याचेसह एकूण ६१ माओवाद्यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण

भुपती ऊर्फ सोनूसह ०२ डिकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एकूण ६१ माओवाद्यांनी एकूण ५४ अग्निशस्त्रांसह माओवादी गणवेशात केले आत्मसमर्पण, महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण ०५ कोटी २४ लाख रुपयांचे बक्षिस

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्हा पालकमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या समोर वरिष्ठ नक्षल नेता भूपती याने 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले. आजपर्यंत एकुण ७२२ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. याच वर्षी दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी भुपती याची पत्नी दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटीची सदस्य ताराक्का सिडाम हिच्यासह एकूण ११ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला होता.

सोहळ्यादरम्यान गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने यापुर्वीच आत्मसमर्पण केलेल्या एकूण १७ माओवादी सदस्यांना पुनर्वसनासाठी मिळणाऱ्या एकूण निधीपैकी २.५ लाख रुपये प्रत्येकी असे एकूण ४२.५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. उर्वरीत माओवाद्यांना हिंसेचा त्याग करुन आपली शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामिल होत शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. ‘आजचा दिवस गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस असून, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळजवळ संपुष्टात आल्याचे ते म्हणाले.

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती

१) मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ अभय (पोलीत ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सिपीआय माओवादी तसेच सचिव-केंद्रीय रिजनल ब्युरो)

दलममधील कार्यकाळ

१) सन १९७४ मध्ये आयटीआय मध्ये शिक्षण घेत असताना रॅडीकल छात्र संघटनमध्ये प्रवेश घेऊन सन १९७९ पर्यंत काम केले.

२ ) सन १९७९ पासून पेदापल्ली परिसरात सेंट्रल ऑर्गनायझरची कामे सन १९८२ पर्यंत करत होता.

३) सन १९८२ मध्ये पिपल्स वॉर ग्रुप च्या महादेवपुर दलममध्ये पार्टी सदस्य पदावर भरती होऊन सन १९८३ पर्यंत काम केले.

४) सन १९८३ मध्ये अहेरी दलम (गडचिरोली) मध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन १९८४ पर्यंत काम केले.

५) सन १९८४ मध्ये सिरोंचा आणि अहेरी दलमचा समन्वय कर्ता म्हणून पदोन्नती होऊन सन १९८७पर्यंत काम केले.

६) सन १९८७ मध्ये डिव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन सन १९८८ पर्यंत काम केले.

७) सन १९८८ मध्ये एफसी (फरिस्ट कमिटी) / एसड़ोडसीएम पदावर पदोन्नती होऊन सन १९८९ पर्यंत काम केले.

८) सन १९८९ मध्ये कसनसूर दलममध्ये बदली होऊन अहेरी-कसनसूर एरीयामध्ये सन १९९४ पर्यंत काम केले.

९) सन १९९४ मध्ये एओबी (आंध्रप्रदेश ओडीसा बॉर्डर) झोनमध्ये बदली होऊन एफसी इंचार्ज म्हणून सन १९९५ पर्यंत काम केले.

१०) सन १९९५ मध्ये डीकेएसोडसी सचिव पदावर पदोन्नती होऊन दंडकारण्य झोनल मध्ये सन १९९७ पर्यंत काम केले.

११) सन १९९७ मध्ये पदोन्नती होऊन सीसीएम (केंद्रीय समिती सदस्य) पदावर, सन २००७ मध्ये दंडकारण्य झोनल मध्ये काम करत असताना पदोन्नती होऊन पोलीत ब्यूरो सदस्य पदावर तसेच सन २०१७ मध्ये सिआरबी (सेंट्रल रिजनल ब्यूरो) सचिव पदावर पदोन्नती होऊन राही दलमसोबत आजपर्यंत काम केले.
५६ चकमक खून – १० इतर- १३ एकुण- ७९
बक्षीस ५० लाख
आत्मसमर्पनानंतर मिळणारी रक्कम ०३ कोटी ०१ लाख, ५५ हजार रुपये

२) विवेक ऊर्फ भास्कर ऊर्फ उमेश ऊर्फ प्रकाश ऊर्फ महेश ऊर्फ विजय ऊर्फ सुरेंदर ऊर्फ बिरसा ऊर्फ रघु ईररी (डिकेएसझेडसीएम, डिके झोन टेक्नीकल डिपार्टमेंट)

३) स्वाती सायलु सलाकुला ऊर्फ सरोजा ऊर्फ लता (डिकेएसझेडसीएम, डिके झोन टेक्नीकल डिपार्टमेंट)

४) शबीर ऊर्फ अर्जुन कोवा येमला (डिव्हीसीएम, राही दलम)

५) जीतरु ऊर्फ गंगु जोगा नुपो (डिव्हीसीएम, राही दलम)

६) दलसू ऊर्फ मैनु ऊर्फ जोगा पुसु गावडे (डिव्हीसीएम, गडचिरोली टेक्नीकल डिपार्टमेंट)

७) सागर ऊर्फ सुक्कु ऊर्फ बुच्चा लच्चा सिडाम (डिव्हीसीएम, गडचिरोली टेक्नीकल डिपार्टमेंट)

८) पद्मा ऊर्फ पार्वती होयाम (डिव्हीसीएम, डीके झोन टेक्नीकल डिपार्टमेंट)

९) अंजू ऊर्फ स्नेहा ऊर्फ लिना ऊर्फ अरुणा ऊर्फ अंजम्मा पोचय्या चिंताकिदी (डिव्हीसीएम, डीके झोन टेक्नीकल डिपार्टमेंट)

१०) रामदास ऊर्फ रामजी चन्ना गावडे (डिव्हीसीएम, डीके झोन टेक्नीकल डिपार्टमेंट)

११) रविकुमार ऊर्फ मल्लेश ऊर्फ कुमार ऊर्फ रवि मुपलय्या मनुगाला (डिव्हीसीएम, डीके झोन टेक्नीकल डिपार्टमेंट)

१२) राजु ऊर्फ कलमसाय ऊर्फ रमेश कुटके वेलादी (डिव्हीसीएम, गट्टा दलम)

१३) निखील ऊर्फ राजेश ऊर्फ आयतु पांडू लेकामी (डिव्हीसीएम, कंपनी क्र. १०)

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले नक्षल सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून १.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

एकूण ६१ पैकी 12 माओवादी सदस्यांनी पती-पत्नी जोडीने आत्मसमर्पण केले आहे:

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन गटाने आत्मसमर्पण केल्यास एकत्रित मदत म्हणून एकुण १० लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे,

गडचिरोली पोलीस दलापुढे सन २०२२ ते आतापर्यंत एकूण १३४ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी सन २०२५ मध्ये आजपावेतो (आज आत्मसमर्पित झालेल्या ६१ माओवाद्यांसहित) एकूण १०१ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *