दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा चंद्रपुरात निषेध, बायपास रोडवर चक्काजामचा प्रयत्न

दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपुरात मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर शहरातील बायपास रोडवरील तेलंगणा-महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांवर नियंत्रण मिळवले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *