यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा प्रभाव आता लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात दिसायला सुरुवात झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या पैनगंगा नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाल्यामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळी देखील मोठी वाढ झाली आहे. वर्धा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने झालेल्या या वाढीचा परिणाम आता चंद्रपूर शहरालगच्या इरई आणि झटपट या नद्यांवर देखील दिसायला लागलाय. चंद्रपूर शहराकडून सास्ती, हडस्ती आणि राजुऱ्या कडे जाणारा मार्ग इरई नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने बंद झालाय. या सोबतच चंद्रपूर शहरालगत असलेल्या इरई आणि झटपट नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने चंद्रपूर शहराला देखील याचा फटका बसू शकतो. सध्या ही परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रशासन वर्धा नदीच्या पाणी पातळीत होणाऱ्या वाढीकडे लक्ष ठेवू नये.
