बिहार मधील एनडीएच्या विजयाचा चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

स्थानिक गांधी चौकात आ. किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात मिठाई वाटप करत केली फटाक्यांची आतिषबाजी, ढोल वाजवून विजयाचा व्यक्त केला आनंद

 बिहार विधानसभेतील एन.डी.ए.च्या भव्य विजयानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे शहरातील गांधी चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात लाडू वाटप करत संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून सोडला.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्याच्या गजरात नाचत गात विजयाचा जल्लोष साजरा केला. बिहारच्या जनतेने विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासन यांना प्राधान्य देत एन.डी.ए. आघाडीला मोठा जनादेश दिला आहे. आम्ही बिहारच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. हा विजय बिहारच्या विकासयात्रेत नवा अध्याय ठरेल, असा विश्वास आ. किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *