चंद्रपूर पोलिसांनी महिला , सायबर आणि वाहतूक सुरक्षेसाठी नवीन जनजागृती रथ सज्ज केले आहेत. नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. महिला व मुलींसाठी तयार केलेल्या सुरक्षा मंत्र नामक पुस्तिकेचेही त्यांनी लोकार्पण केले. जनसामान्यात कायदे आणि नियमांविषयी जनजागृती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन संदीप पाटील यांनी याप्रसंगी केले.
