भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या भाजप उमेदवारांच्या यादीत फेरबदल करणाऱ्या महानगर अध्यक्षांना हटविल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, खुद्द महानगर अध्यक्षांच्या प्रभागातच फटाके फोडून कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद, पक्ष नासविणाऱ्या महानगर अध्यक्षावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी, पैशाची देवाणघेवाण करत यादी बदलल्याचा गंभीर आरोप
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या भाजप उमेदवारांच्या यादीत फेरबदल करणाऱ्या चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्षांना हटविल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खुद्द महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्या तुकूम प्रभागातच फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. पक्ष नासविणाऱ्या महानगर अध्यक्षावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करतांना उमेदवार बदलत पैशाची देवाणघेवाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
