चंद्रपूर जिल्ह्यातील नंदगुर येथे महाशिवरात्रीचा सण आज आदिवासी समाजाच्या वतीने मोठ्या पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजात महादेवाला संभू सेक असं म्हणतात आणि मूल तालुक्यातील नंदगुर येथे संभू सेक यांचं अतिशय जुनं पेनठाणा म्हणजे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी रविवार आणि सोमवार असा दोन दिवसीय महाशिवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आज सकाळी विविध प्रकारचे आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले, सोबतच या ठिकाणी नवीन मूर्तीची देखील स्थापना करण्यात आली.
