चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक थाटात थाटात संपन्न झाली.जटपूरा गेट परिसरातील चंद्रपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणुकीच्या अग्रस्थानी राहिला त्याचे विसर्जन आज सकाळी झाले.
शहरातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मुर्त्यांचे दाताळा मार्गावरील रामसेतू पुलाखाली असलेल्या मनपाने उभारलेल्या स्थायी विसर्जन कुंडात विसर्जन झाले. चंद्रपुरात विसर्जन मार्गावर पोलिस, मनपा प्रशासनाच्या वतीने चोख सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. विसर्जन सोहळा आज सकाळपर्यंत सुरू होता.
