सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र आणि आंबेडकरी चळवळीतील प्रभावी नेतृत्व असलेले राज्यसभेचे माजी उपसभापती स्व. बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून आज चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे भारतीय डाक विभागातर्फे टपाल तिकिटाचे विमोचन करण्यात आले.
आ. सुधीर मुनगंटीवार, आ.विजय वडेट्टीवार, आ.अभिजीत वंजारी, आ. सुधाकर अडवले, आ.किशोर जोरगेवार, आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राजाभाऊ खोबरागडे यांच्या कार्याला अभिवादन म्हणून हे टपाल तिकिट प्रकाशित करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या तिकीटासाठी लागणारा 12 लाखांचा निधी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला गेलाय. या विमोचनाप्रसंगी मान्यवरांनी हे टपाल तिकीट म्हणजे समतेच्या लढ्याला आणि सामाजिक न्यायाच्या व्रताला दिलेले ऐतिहासिक अभिवादन असल्याचे सांगितले. जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त 27 सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
