चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसेखुर्द उजवा मुख्य कालवा बांधकामात सुमारे 14 कोटींच्या घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून चार बड्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट अनुभव प्रमाणपत्रे सादर करणे, नियमबाह्य अद्ययावतीकरण करणे, निविदेची किंमत वाढविणे यासह विविध गैरप्रकार या अधिकारी आणि कंत्राटदारांनी संयुक्तपणे केल्याचे उघड झाले आहे.
जलसंपदा विभाग नागपूरचे तत्कालीन मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता संजय कोल्हापूरकर ,विभागीय लेखाधिकारी सुधाकर घेगारे,कार्यकारी अभियंता देवेंद्र शिर्के यांच्यासह दोन खाजगी कंपनी संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
