खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठाही सुरळीत
चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विभागाने 4 लाख 85 हजार हेक्टर वर खरिपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात कापूस ,धान, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिके आहेत. यातील कापूस आणि धान याची प्रत्येकी टक्केवारी 40% एवढी आहे तर सोयाबीन आणि तूर यांची एकूण टक्केवारी 20 टक्क्यांपर्यंत आहे. जिल्ह्यात रसायनिक खतांचा तुटवडा नसून एकूण 68 हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे. राज्य शासनाने आवाहन केल्यानुसार शेतकऱ्यांनी 15 जून पूर्वी पेरणीची घाई करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात सात जून रोजी मॉन्सूनचे आगमन होते. मात्र अजूनही तापमान चढेच असून पावसाचा पत्ता नसल्याने यंदाचा खरीप हंगाम उशिराने सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठाही सुरळीत करण्यात आला आहे.
