आज नगरसेवक भालचंद्र दानव यांनी आ. किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन आझाद गार्डन येथे नवीन अत्याधुनिक स्विमिंग पूल बांधण्यात यावा, यासाठी निवेदन सादर केले.
चंद्रपूर शहरातील युवक, विद्यार्थी तसेच क्रीडाप्रेमींना दर्जेदार जलतरण सुविधा उपलब्ध व्हाव्यात, जलतरण खेळाला प्रोत्साहन मिळावे आणि नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उत्तम सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली.
यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विषयाचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
