सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज चंद्रपूर शहरालगतच्या भटाळी येथील रखडलेल्या पुलाची पाहणी केली.
चंद्रपूर शहरापासून जवळ असलेल्या 7 गावांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे मात्र पुलाची उंची कमी असल्याने इरई नदीच्या पाणी पातळी वाढ होताच हा पूल वाहतुकीसाठी बंद होतो. त्यामुळे हा पूल होणे अत्यंत गरजेचे आहे मात्र गेल्या सहा वर्षांपासून या पुलाचे बांधकाम थंड बस्त्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी याबाबत तक्रार केल्यामुळे इंद्रनील नाईक यांनी आज चंद्रपुरातल्या आपल्या दौऱ्यात पूलाची पाहणी केली.
