चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या जंगलात तेंदूपाने तोडणाऱ्या चार महिलांवर हल्ला करून त्यांना ठार मारणारी टी-2 वाघीण वनविभागाने केली जेरबंद

 दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही जंगलात तेंदूपाने तोडणाऱ्या चार महिलांवर हल्ला करून त्यांना ठार मारणारी वाघीण वनविभागाने अखेर जेरबंद केली आहे. याच तालुक्यातील पवनपार जंगल कक्ष क्रमांक 282 मध्ये ही टी-2 नावाची वाघीण वनविभागाने जेरबंद केली.

चार महिलांना एकाच वेळी ठार मारण्याच्या घटनेनंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाने आपली संपूर्ण शक्ती या भागात ट्रॅप कॅमेरे -पायी गस्त, सीसीटीव्ही कॅमेरे लावत पणाला लावली होती. वनविभागाचे बेशुद्ध करणारे पथक देखील या भागात सतत गस्त घालत होते. याच दरम्यान त्यांना टी-2 वाघिणीचा सुगावा लागला. त्यानंतर डार्ट मारून वाघिणीला जेरबंद करण्यात आले. मात्र या वाघिणी सोबत असलेल्या बछड्याबाबत वनविभागाने कुठलीही स्पष्टता केलेली नाही.
हल्लेखोर वाघीण जेरबंद झाल्यानंतर या भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *