चंद्रपुरात सूत्रे हाती घेताच महापौर- उपमहापौर ॲक्शन मोडवर

शहरातील गर्दीच्या गोल बाजार परिसरातील अपूर्ण प्रसाधनगृहाचे बांधकाम महिन्याभरात पूर्ण करण्याचा दिला शब्द ,या भागातील महिला भाजीविक्रेत्यांनी प्राधान्याने पुढे केला होता प्रश्न

सुमारे साडेतीन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चंद्रपुरात मनपा सत्ता स्थापना झाली आहे. काल महापौर -उपमहापौर यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर आज स्वतः महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह शहरातील गोल बाजाराची पाहणी केली. या गोल बाजारातील भाजीविक्रेत्या महिलांनी परिसरातील प्रसाधनगृहांची कमतरता व अपूर्ण बांधकाम असलेल्या प्रसाधनगृहाबाबत प्राधान्याने समस्या मांडली होती. महापौर स्वतः या भाजीविक्रेत्या महिलांची संवाद साधताना दिसल्या. त्यांनी येत्या महिनाभरात प्रसाधनगृहाचे बांधकाम पूर्ण करून ते सेवेत आणण्याचा शब्द दिला आहे. येत्या काळात शहरातील इतरही ठिकाणी सुरू असलेली अशा प्रकारची लोकोपयोगी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *