आदिवासी विद्यार्थ्यांची बीआरटीसी केंद्राला भेट

चंद्रपूर, दि. 22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत विविध आश्रमशाळांमधील 9 वी आणि 11 वी वर्गातील विद्यार्थ्यांकरिता उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बांबू काम, टेराकूटाचे विविध वस्तू बनवणे, मेहंदी, रांगोळी आर्ट, योगा, आर्चरी, विविध वाद्य वाजवणे, कराटे, लाठी काठी, गोंडी पेंटिंग यासारख्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर विषय शिकवण्यासाठी मानधन तत्वावर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आणि ते शिक्षक उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात 24 तास विद्यार्थ्यांना उपलब्ध होते.

सदर प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून तसेच पुढील भविष्यामध्ये त्यांना बांबू टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करता यावे, या उद्देशाने 40 आदिवासी विद्यार्थ्यांना चिचपल्ली येथील ‘बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र’ (बीआरटीसी) येथे विद्यार्थ्यांची भेट घडवून आणण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी बांबू प्रशिक्षणाबद्दल माहिती जाणून घेतल्याचे अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *