वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. ९: मंगळवारी लोकसभेत निवडणूक सुधारणांवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आरएसएस आणि भाजप देशातील संस्थांवर कब्जा करत आहेत. यामध्ये निवडणूक आयोग, अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय गुप्तचर विभाग आणि आयकर विभाग यांचा समावेश आहे. हे स्पष्ट आहे की, भाजप निवडणूक आयोगाला निर्देश देऊन लोकशाहीला हानी पोहोचवत आहे.
राहुल गांधी यांनी तीन मागण्या केल्या. ते म्हणाले, निवडणुकीच्या एक महिना आधी सर्व राजकीय पक्षांना मशीन-रीडेबल मतदार याद्या उपलब्ध करून द्याव्यात. सीसीटीव्ही फुटेज नष्ट न करण्याचे नियम करणारा कायदा बदलला पाहिजे. आपल्याला ईव्हीएम पाहाण्याची परवानगी दिली पाहिजे. मतांची चोरी ही देशविरोधी आहे. सरकारला निवडणूक सुधारणा नको आहेत. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीतून सत्तेवरच्यांना काढून टाळण्यात आले? निवडणूक आयुक्तांना शिक्षा होऊ शकत नाही अशी तरतूद का केली गेली? आणि निवडणुकीनंतर ४५ दिवसांनी सीसीटीव्ही फुटेज का हटवले? असे ३ प्रश्न त्यांनी विचारले.

