चंद्रपूर जिल्ह्यातील वढोली येथे मित्राच्या लग्नात डीजे वर नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

मित्राच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झालाय. अल्पेश दहागावकर असं २५ वर्षीय मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. अल्पेश लग्नाच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचतांना अचानक खाली कोसळला. सुरुवातीला उपस्थितांना हा प्रकार लक्षात आला नाही मात्र काही वेळातच तो प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्याला गोंडपिपरी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे लग्न समारंभात एकच खळबळ उडाली असून आनंदाचे वातावरण क्षणात शोकमय झाले. अल्पेश दहागावकर याच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *