चंद्रपुरात जटपुरा गेट परिसरात डॉ. मुंधडा रुग्णालयात चोरी करणाऱ्या आरोपी श्रीकांत चुनारकर उर्फ बोटतुट्या याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून 60 हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याचा साथीदार अतुल राणा मात्र अद्याप फरार आहे. डॉ. मनिष मुंधडा यांच्या रुग्णलयात प्रवेश करत केबिनमध्ये चोरी करताना रात्रीच्या सुमारास सीसीटीव्हीत हे आरोपी कैद झाले होते.
