सोनापूर येथे जलशुद्धीकरण यंत्राचे आ . वडेट्टीवारांच्या हस्ते उद्घाटन

सोनापूर वासियांची पेयजलची समस्या निकाली

सावली तालुक्यातील सोनापूर येथील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना आता शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.

उद्घाटन प्रसंगी आ. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, “स्वच्छ पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. ग्रामीण भागातही शहरी सुविधांसारख्या सोयी उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळेच जिल्हा खनिज प्रतिष्ठान विकास निधी अंतर्गत येथील ग्रामस्थांना शुद्ध पेयजल उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून आपण १६.७० लक्ष निधी मंजूर करून दिला. या जलशुद्धीकरण यंत्रामुळे अनेक कुटुंबांचे आरोग्य सुधारेल आणि पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर आळा बसेल.तसेच यंत्राची उभारणी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी शुद्ध करण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे सोनापूरसह आसपासच्या भागातील नागरिकांनाही याचा लाभ होणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
“दीर्घकाळापासून सोनापूर वासियांना स्वच्छ पाण्याची समस्या भेडसावत होती, आता या यंत्रामुळे मोठा दिलासा मिळाला,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या उद्घाटनप्रसंगी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहणे, प्रशांत चिटणूरवार, आशिष मनबत्तुलवार, निखिल सुरमवार, कृष्णा राऊत, किशोर कारडे, यांचेसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *