पोलिसांना पत्र देत पिस्तूल आणि अंगरक्षकांची ही केली मागणी ,या प्रकाराकडे सध्या तरी विनोदाने पाहिले जात असले तरी पोलिसांनी मात्र याची घेतली आहे दखल
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात स्वयंघोषित पंतप्रधान असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महादेव आसेकर नामक एका व्यक्तीने स्वतःला पंतप्रधान घोषित करत लेटरपॅड ही प्रिंट केले असून त्यावर पीएम भारत सरकार असे छापले आहे. आपल्या स्वतःच्या फॉर्च्यूनर गाडीवरही त्यांनी पीएम लिहिले आहे. आसेकर यांना जमीन विक्रीतून मोठी रक्कम मिळाली, आणि या रकमेतून लक्झरी वाहन घेतल्याचे सांगितले जाते.
आसेकर यांनी पोलिसांना पत्र देत पंतप्रधान म्हणून आपल्याला अंगरक्षक आणि स्वसंरक्षणासाठी पिस्तूल देण्याची ही मागणी केली आहे. आपल्या मागण्या पूर्ण न करणाऱ्या ठाणेदाराला बदलून नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे. या प्रकाराकडे सध्या विनोदी पद्धतीने बघितले जात असले तरी पोलिसांनी मात्र याची दखल घेतल्याचे समजते. या नव्या पंतप्रधानाची मात्र वरोरा शहरात चर्चा आहे.
