चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात सख्ख्या भावानेच केली बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या तर हल्ल्यात आई देखील गंभीर जखमी, संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात सख्ख्या भावानेच बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली असून या हल्ल्यात आई देखील गंभीर जखमी झाली आहे. भद्रावती शहरातील झाडे प्लॉट परिसरात हा थरार घडला. सुरज शंकर भोंडे वय २८ वर्षे असं आरोपीचे नाव असून संजीवनी शंकर भोंडे वय ३२ वर्षे असे मृतक बहिणीचे नाव आहे.

सौ. पुष्पा शंकर भोंडे वय ५८ वर्षे असे गंभीर रित्या जखमी झालेल्या आईचे नाव आहे. संपत्तीच्या वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून घरात वाद सुरु होते. यात एकाच घरात आई व बहीण हे वेगळे राहत होते तर भाऊ आणि वडील वेगळे राहत असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळी झालेल्या जोरदार वादानंतर हा सर्व प्रकार घडला. भद्रावती पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भावाला अटक केली असून वडिलांना देखील ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *