भद्रावती चे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईला मॅट कडून स्थगिती

महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षरीने 3 ऑक्टोबर ला जारी करण्यात आला होता निलंबन आदेश, परमेश्वर मेश्राम या 55 वर्षीय शेतकऱ्याने 26 सप्टेंबर ला भद्रावती तहसील कार्यालयात घेतले होते विष आणि तीन दिवसांपूर्वी त्यांचा झालाय मृत्यू, शेतजमिनीचा फेरफार करण्यास तहसील कार्यालयाकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत असल्याने परमेश्वर मेश्राम यांनी उचलले होते टोकाचे पाऊल, या प्रकरणाने भद्रावती तालुक्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या विरोधात उमटली होती तीव्र संतापाची लाट, त्यामुळे प्रशासनाने दोन्ही अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासात दोषी मानून केले होते निलंबितचंद्रपूर जिल्ह्य़ातील भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच मॅट कडून स्थगिती देण्यात आली आहे.महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षरीने ३ ऑक्टोबरला निलंबन आदेश जारी करण्यात आला होता. पण आता या आदेशावर मॅटने स्थगिती दिल्याने या प्रकरणाला नवा वळण मिळालं आहे.

याच प्रकरणाशी संबंधित म्हणजेच भद्रावती तहसील कार्यालयात २६ सप्टेंबरला ५५ वर्षीय शेतकरी परमेश्वर मेश्राम यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, आणि तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
शेतजमिनीचा फेरफार करण्यास तहसील कार्यालयाकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप मेश्राम यांनी केला होता. या घटनेनंतर तालुक्यात प्रचंड संतापाची लाट उसळली होती, आणि प्राथमिक तपासानंतर प्रशासनाने तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना निलंबित केले होते.
मात्र आता मॅट कडून मिळालेल्या स्थगितीमुळे दोन्ही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे शेतकरी संघटनांकडून या निर्णयावर संताप व्यक्त केला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *