स्नेहांकित , चंद्रपूर

चंद्रपुरातील अग्रगण्य सांस्कृतिक संस्था स्नेहांकित दरवर्षी हिराई संगीत महोत्सव आयोजित करीत असते . ह्यावर्षी हा महोत्सव 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित आहे. दिनांक 14 फेब्रुवारीला सुप्रसिद्ध युवा गायिका श्रुती बुजरबरुवा यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित असून दिनांक15 फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका केतकी माटेगांवकर यांचा “रंग माझा वेगळा”हा अनोखा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित आहे.

कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी सात वाजता असून, आश्रयदाते व देणगीदारांसाठी विशेष आसन व्यवस्था आयोजित आहे.रसिक प्रेक्षकांसाठी प्रवेश नि:शुल्क असून. देणगीदारांचे स्वागत आहे.

यावर्षीचा राणी हिराई सन्मान पुरस्कार प्राध्यापिका व ज्येष्ठ समाजसेविका *श्रीमती प्रभावती मुठाळ यांना जाहीर करण्यात आला आहे .
सदर पुरस्कार रसिकांच्या उपस्थितीत दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सन्मानपूर्वक देण्यात येईल.

धन्यवाद !
डॉ.अशोक वासलवार
अध्यक्ष
स्नेहांकित ट्रस्ट, चंद्रपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *