स्व. अजित दादा पवार यांच्या अस्थींचा कलश आज बारामतीहून चंद्रपुरात पोचला. पक्षाच्यावतीने स्थानिक पक्ष पदाधिकाऱ्यांनी हा कलश चंद्रपूरच्या श्रमिक पत्रकार भवन सभागृहात सर्वांच्या दर्शनासाठी ठेवला आहे. स्व अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध पक्षांचे नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व चंद्रपूरकर नागरिकांनी रीघ लावली. चंद्रपूर शहरालगत असलेल्या वढा येथील तीर्थक्षेत्र संगमावर या अस्थींचे आजच विसर्जन केले जाणार आहे.
