दिव्यांग बांधवांना UDID देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा विशेष उपक्रम

चंद्रपूर :दिव्यांग बांधवांना UDID म्हणजेच युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन डिजिट देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने विशेष उपक्रम सुरु केलाय. दिव्यांगांसाठी केंद्र सरकारने 2018 साली युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन डिजिट म्हणजेच UDID जारी करून त्यांना आय कार्ड देण्याची योजना सुरू केली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही अनेक दिव्यांग बांधव या योजनेपासून वंचित आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या जवळजवळ 5800 दिव्यांग या योजनेपासून वंचित आहे. जिल्ह्यात असे अनेक नागरिक देखील आहे ज्यांच्याकडे दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र आहे मात्र केंद्र सरकारच्या पोर्टलवर या प्रमाणपत्राचं रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांना युडीआयडी मिळू शकलेला नाही. यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने एक विशेष उपक्रम राबवत तालुका निहाय अशा दिव्यांगांच्या नोंदणीला सुरुवात केलेली आहे. या प्रकारचा युडीआयडी मिळाल्यामुळे दिव्यांग बांधव राज्य आणि केंद्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या अनेक योजनांना अतिशय सुलभपणे पात्र ठरतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *