चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे बेवारस आढळली मतदान ओळखपत्रे, शेताच्या बांधीमध्ये आढळून आली ओळखपत्रे

शहरातील सुंदरनगर भागातील घटना

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे शेताच्या बांधी मध्ये मतदार ओळखपत्र आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील सुंदरनगर परिसरात शेतात या परिसरातील काही मुलं खेळत असताना त्यांना हे मतदान कार्ड दिसले. ही मतदान ओळखपत्रे मुदतबाह्य की बनावट अशी शंका निर्माण झाली आहे.

शिवसेना उबाठाचे शहराध्यक्ष भूषण रामटेके या प्रकरणी आज तहसीलदारांकडे तक्रार नोंदवणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेवारस अवस्थेत सापडलेल्या या मतदार ओळखपत्रांमुळे शहरात चर्चाना उत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *