चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर आणि नांदगाव या भागात येणाऱ्या सनफ्लॅग कोळसा खाणी विरोधात एकवटले ग्रामस्थ, पूर्ण 802 हेक्टर जमीन संपादित करून मोबदला आणि नोकरी देण्याची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर आणि नांदगाव या भागात प्रस्तावित सनफ्लॅग कोळसा खाण व्यवस्थापनाने थातुरमातुर 25 एकर जमीन विकत घेणे ,जमिनीला संरक्षक भिंत बांधून खाण प्रक्रिया सुरू करण्याची तयारी चालविली आहे. सनफ्लॅग कंपनीविरोधात ग्रामस्थ एकवटले आहेत. आज विसापूर गावातून मोठ्या संख्येत शेतकरी आंदोलकांनी निषेध मोर्चा काढून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ही कोळसाखाण सुरू करण्यासाठी जाहीर जन सुनावणी कंपनीच्या विरोधात होती. याशिवाय ग्रामसभेनेही नकारात्मक अभिप्राय दिला आहे. अशा स्थितीत कंपनीने मात्र शेतकऱ्यांना डावलणे सुरूच ठेवले आहे. संपूर्ण 802 हेक्टर जमीन संपादित करून मोबदला आणि नोकरी देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे अन्यथा कोळसा खाण होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *