अबब….चंद्रपुरात 14 हजार किलो भेसळीचे खाद्यतेल पकडले

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, मूल तालुक्यात निकृष्ट खाद्यतेलाचा साठा जप्त

चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जिल्ह्यातील मूल येथील खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर धडक कारवाई केली आहे. ऐन दिवाळीच्या काळात ही धाड कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.गुप्त माहितीच्या आधारे चामोर्शी रोड येथील एका रिपॅकिंग युनिटवर धाड घालून पथकाने विविध ब्रँडच्या रिफाइंड सोयाबीन तेलाचे पाच नमुने घेतले असून 22 लाख रु. किंमतीचा सुमारे १४ हजार किलो साठा जप्त केला आहे. पुनर्वापर केलेली तेल पिपे वापर आणि निकृष्ट दर्जाचा संशय यावरून ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रवीण उमप यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *