चंद्रपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगाराची इलेक्ट्रिक एसटी बस अचानक धडधडून पेटली. धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवासी तातडीने बसमधून उतरले.
ही घटना चंद्रपूर -गडचिरोली मार्गावरील घंटा चौकी जवळ झाली. या इलेक्ट्रिक बसमधून मोठ्या संख्येत प्रवासी प्रवास करत होते. या आगीत संपूर्ण बस जळून राख झाली. या घटनेनंतर इलेक्ट्रिक एसटी बसेसच्या देखभाली बाबतचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलाय.
