भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रमचे अनावरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २९ :भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-क् चे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते आज सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. हे रॉकेट खासगी अंतराळ कंपनी स्कायक्रूट एअरोस्पेसने बनवले आहे. यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी कंपनीच्या नवीन इन्फिनिटी कॅम्पसचेही उद्घाटन केले.

या कॅम्पसमध्ये अनेक लॉन्च व्हेईकलच्या डिझाइन, डेव्हलपमेंट, इंटिग्रेशन आणि टेस्टिंगचे काम केले जाईल. हा कॅम्पस तेलंगाणातील हैदराबाद येथे बनवण्यात आला आहे. कंपनीचे मुख्यालयही येथेच आहे. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.

स्कायक्रूट एअरोस्पेस कंपनीची स्थापना पवन चंदना आणि भरत डाका यांनी २०१५ मध्ये केली होती. हे दोघेही आयआयटी पदवीधर आहेत आणि इस्रोचे माजी शास्त्रज्ञ राहिले आहेत. अथक प्रयत्नातून त्यांनी हे यश संपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *